साकव सेवा संस्था
आमच्याबद्दल
"साकव" म्हणजे छोटा पूल — जो प्रत्येक अडथळा पार करून आपल्याला यशाच्या दिशेने नेतो.
आमचा उद्देश
"साकव सेवा संस्था" या संस्थेचा मुख्य उद्देश सर्व मराठी भाषी लघु उद्योजक आणि व्यावसायी बंधू-भगिनींना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे, त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणे. त्याचबरोबर मराठी खाद्य संस्कृती, पेहराव, वेशभूषा, कलाकृती यांचे संवर्धन व जतन करणे.
आमचे चार स्तंभ
उद्योजकांना बळ
मराठी भाषी लघु उद्योजक आणि व्यावसायिक बंधू-भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे आमचे पहिले ध्येय आहे.
देशव्यापी पोहोच
आपल्या व्यवसायाचे उत्पादन देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मंच एक सेतू म्हणून काम करतो.
संस्कृतीचे जतन
मराठी खाद्य संस्कृती, पेहराव, वेशभूषा आणि कलाकृती यांचे संवर्धन व जतन करणे हे आमचे सांस्कृतिक उद्दिष्ट आहे.
स्वदेशी खरेदी
मराठी भाषी क्रेत्यांना आपल्याच बांधवांच्या उत्पादनांची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
हा मंच कसा काम करतो?
विक्रेत्यांसाठी
हे लक्ष्यात घेऊन आम्ही हा मंच (प्लॅटफॉर्म) तयार केला आहे. याच्या माध्यमातून आपल्या सर्व व्यावसायिकांचे उत्पादन देशभरात उपलब्ध करून देत आहोत. आपला व्यवसाय नोंदवा आणि लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा.
क्रेत्यांसाठी
सर्व मराठी भाषी लोक (क्रेते) यांना पण आग्रह करत आहोत की आमच्या या मंचावर येऊन खरेदी करून आपल्या बांधवांना मदत करून समृद्ध करा — ही विनंती.
धन्यवाद
आपल्या सहभागाने हा मंच अधिक समृद्ध होईल. एकत्र येऊन आपण मराठी उद्योजकतेला नवी उंची देऊ शकतो.